आगरतळा : त्रिपुरा राज्यात दि. 19 पासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात महापूर आलेला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाला असून दोन लोक हरवले आहेत, तसेच सुमारे 65 हजार लोक बेघर झाले आहेत आणि विविध ठिकाणी 558 निवारा केंद्रात हलवले गेले आहेत. (Tripura flood)
भारतीय सैन्य दलाच्या बचाव पथकांनी हेलिकॉप्टर द्वारे 330 लोकांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले आहे.
मुख्यमंत्री डॉ. माणिक साह यांनी त्रिपुराची हवाई पाहणी केली असून आगरतळा शहर पाण्याखाली असून एकूण राज्याच्या विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान ,आले आहे, ५ हेक्टर वरील भाजीपाला आणि एक लाख हेक्टर वरील भातपीक नष्ट झाले आहे. एकूण 17 लाख लोकांना या महापुराची झळ बसली आहे. (Tripura flood)
पुरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राची 40 कोटींची मदत
पूरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राने 40 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. राज्य सरकारला पूर आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफ 11 तुकड्या, लष्कराच्या तीन तुकड्या आणि भारतीय वायुसेनेची चार हेलिकॉप्टर्स केंद्राने तैनात केली आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती