Thursday, October 10, 2024
Homeआंतरराष्ट्रीयAccident : नेपाळमध्ये भीषण बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार

Accident : नेपाळमध्ये भीषण बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार

Nepal Bus Accident : भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, बस मधील १४ जणांना जलसमाधी मिळाली असून घटनास्थळी मदत पथके काम करत आहेत. यूपी एफटी ७६२३ या क्रमांकाची ही बस असून पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडूकडे रवाना झाली होती. ही संपूर्ण बस नदीत कोसळून मोठा अपघात आणि प्राणहानी झाली आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील नदीत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास प्रवाशी घेऊन ही बस काठमांडूकडे रवाना झाली होती. अपघातानंतर मदत आणि बचावकार्यात १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १६ जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्थानिक मीडियानुसार, अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेत आणि अपघातस्थळी अद्यापही मदत व बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात मृतांचा तसंच जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, ज्यात ४५ पोलिस अधिकाऱ्यांची टीम वरिष्ठ पोलिस अधीक्षक माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. (Accident)

पोखर्यात भारतीय प्रवासी माजेरी रिसॉर्टवर राहात होते. शुक्रवार सकाळी बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय