beed: स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) बीड(beed)जिल्हा कमिटी तर्फे यंदाचे शहीद भगतसिंग जन्मोत्सव २०२४ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून साजरा केला गेला. यानिमित्ताने जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्व ठिकाणी झालेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वीच संपन्न झाले. एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, माजी राज्य अध्यक्ष व डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव, माजी राज्य उपाध्यक्ष ऍड. याकुब सय्यद, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा अध्यक्ष लहु खारगे, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, माजलगाव तालुका अध्यक्ष पवन चिंचाणे, बीड तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड अशोक (आबा) राठोड, डीवायएफआय जिल्हा कमिटी सदस्य विजय राठोड, शरद नांदे, आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले.
एसएफआयने शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील वारोळा (तालखेड फाटा) येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, तालखेड येथील माध्यमिक विद्यालय, एकदरा येथील माऊली माध्यमिक विद्यालय, राजेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय, सावरगाव येथील माध्यमिक विद्यालय, माजलगाव येथील जवाहर विद्यालय, बीड येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालय या ठिकाणी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.
तालखेड येथील कार्यक्रमास एसएफआयचे माजी राज्य अध्यक्ष, डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष व तालखेडचे माजी सरपंच मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, तालखेडचे सरपंच गुलाबभाऊ मोरे, जिल्हा कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड, नयुम कुरेशी, दशरथ राऊत, अविनाश डुबे, समाधान क्षीरसागर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्री. मोरे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. जाधव सर, श्री. रिंगणे सर, श्रीमती जोशी मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, श्री. गायकवाड सर, श्री. राठोड सर, श्री. टिळे सर, श्री. रांजवण सर, आदी उपस्थित होते. श्री. पुरी सर यांनी सूत्रसंचालन तर श्री. तेरकर सर यांनी आभार मानले.
एकदरा येथील कार्यक्रमास एसएफआयचे माजी राज्य अध्यक्ष मोहन जाधव, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा अध्यक्ष लहु खारगे, तालुका अध्यक्ष पवण चिंचाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. खोटे सर हे होते तर याप्रसंगी शाळेतील इतर शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
राजेगाव येथील कार्यक्रमास मुख्याध्यापक अशोक कचरे सर, सहशिक्षक सुरेश सोळंके सर, तालुका अध्यक्ष पवण चिंचाणे, शरद नांदे, संदीप इंगळे, गाव कमिटीचे महादेव इंगळे, भुषण घाटुळ, आदित्य कुटे, शाळा कमिटीचे हर्षद आबुज, ऋषिकेश सोनवणे, करण गुत्तेदार आदी उपस्थित होते. सावरगाव येथील कार्यक्रमास माजी राज्य अध्यक्ष मोहन जाधव, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, तालुका अध्यक्ष पवन चिंचाणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्री. आडसुळ सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. शिंदे सर, श्री. राठोड सर, श्री. कोरडे सर, आदी उपस्थित होते.
माजलगाव तालुक्यातील वारोळा (तालखेड फाटा) येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथील कार्यक्रमास एसएफआय राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, सिटू ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड अशोक (आबा) राठोड, जिल्हा कमिटी सदस्य विजय राठोड, तालुका अध्यक्ष पवन चिंचाणे, डोरले सर, गोरख जाधव सर, राठोड सर, राऊत सर, घुंगरट सर, शेळके सर, गायकवाड सर, शरद नांदे, संदीप इंगळे, भरत तौर, आदी उपस्थित होते.
बीड (beed)येथील कार्यक्रमास तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका कमिटीचे दिया मते, युवराज चव्हाण, मुख्याध्यापक राऊतमारे सर, जाधव मॅडम, अनुजा टिळेकर, कार्तिक गोबरे आदी उपस्थित होते. माजलगाव येथील जवाहर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमास एसएफआयचे माजी राज्य उपाध्यक्ष व माजी केंद्रीय कमिटी सदस्य ऍड. याकुब सय्यद, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, आनंद सक्राते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्री. अभिमन्यू इबिते सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. देशमुख सर, श्री. भोले सर आदी उपस्थित होते.
स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. त्यात रोख रक्कम, शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारी जीवनावर आधारित ग्रंथ / पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र इ.चा समावेश होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा प्रशासनांनी सहकार्य केले. त्याबद्दल एसएफआय त्यांचे आभार मानते. जिल्ह्यातील त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी ते यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
beed
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित