Saturday, September 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’ च्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, बसवेशवर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.



निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, स्त्री-पुरुष, धर्म, जात-पात, पंथ भेदाच्या पलिकडे जाऊन कोणीही ‘अनुभवमंटप’ मध्ये आपले अनुभव मांडू शकत होते. श्रम हीच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था इतके साधे सोपे तत्त्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सरळ सोप्या भाषेत मांडले.



देवाशी म्हणजे शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली.महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. महात्मा बसवेश्वरांचा लंडन येथेही पुतळा उभारण्यात आला आहे.महात्मा बसवेश्वर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. हे महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. निगडी येथील हा पुतळा लोकवर्गणी लोकसहभागातून केला याला जास्त महत्त्व आहे.असे मुख्यमंत्री म्हणाले.

विशेष लेख : असंघटित कष्टकरी, कंत्राटी कामगारांची ‘गधा मजदूरी’ म्हणजे मालकवर्गाचे नफ्याचे अर्थशास्त्र

आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप


भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय