20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन (Baramati)
बारामती / वर्षा चव्हाण : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील बारामती बसस्थानक, बारामती नगरपरिषद तसेच विविध ठिकाणी मतदार जागृतीबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले. (Baramati)
यावेळी ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक मतदान सहभाग’ अर्थात ‘स्वीप’च्या समन्वयक सविता खारतोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विलास कर्डीले यांच्यासह कु. सोहम वाघ, चंद्रहास धुमाळ, सिद्धार्थ काळे, साक्षी फाळके, गायत्री केद्रे, शर्वरी बाचल, प्रतिभा बोराटे आदी उपस्थित होते.
बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक येथे आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…. आदी घोषणा देण्यात आल्या. (Baramati)
यावेळी प्रवाशी व एसटी कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विधानसभा निवडणुकीत सहभागी होत येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे, असे त्यांनी आवाहन करण्यात आले.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित