bangladesh protests : बांगलादेशात वाढत्या हिंसाचारामुळे पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून पळाल्या आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हजारोंच्या संख्येने जमावाने हल्ला केल्यावर लष्करी हेलिकॉप्टरने हसीना यांनी देश सोडला. लष्कराने सत्ता हातात घेऊन देशात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आणि देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांनी नागरिकांना हिंसाचार थांबवण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
लष्करप्रमुखांनी देशात कर्फ्यू किंवा आणीबाणी लागू करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आणि “आम्ही आज रात्रीपर्यंत यावर तोडगा काढू,” असे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आणि घरांवर परतण्याचे आवाहन केले.
Bangladesh protests
मुख्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी लष्करासह झालेल्या चर्चेत सहभागी झाले आहेत. शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन देत, आपण एकत्र काम करुयात आणि भांडण टाळावे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल