Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड‘बघतोय रिक्षावाला आरोग्य यात्रा’ खराडीतील पठारे स्टेडियम येथे संपन्न

‘बघतोय रिक्षावाला आरोग्य यात्रा’ खराडीतील पठारे स्टेडियम येथे संपन्न

खराडी : रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, समर्थ युवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांच्या सौजन्याने ‘बघतोय रिक्षावाला आरोग्य यात्रेचे आयोजन पठारे स्टेडियम येथे शनिवारी (१५ जुलै) करण्यात आले. यावेळी जवळपास १५० हून अधिक रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी पार पाडली.

सदर आरोग्य यात्रेदरम्यान रक्त तपासणी, रक्तातील साखर, कोलेस्ट्रेरॉल, संपूर्ण रक्त गणना चाचणी (सीबीसी), रक्तदाब, छातीचा एक्स रे, तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यासंबंधी वैद्यकीय तपासण्या मोफत पार पडल्या.

“रिक्षाचालक बांधवांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, समर्थ युवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम यांनी राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. याबद्दल खराडीतील रिक्षाचालक बांधवांच्या वतीने मी आयोजकांचे आभार मानतो. रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अशा प्रकारचे वैद्यकीय तपासणी शिबिर महत्त्वाचे होते आणि याचा लाभ त्यांना नक्की होईल, असे मत यावेळी सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.

वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. केशव क्षीरसागर, सुरेंद्र बापूसाहेब पठारे तसेच अन्य मान्यवर व रिक्षाचालक बांधव उपस्थित होते.

हे ही वाचा

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय