Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्या‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडवली असून, 12 ऑक्टोबरला झालेल्या या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, तिसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 विशेष पथकं तैनात केली आहेत. या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, आणि या सर्व आरोपींना फाशी देण्यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढू.” याशिवाय, शिंदे यांनी इशारा दिला की, मुंबईत इतर राज्यांमधून येऊन दादागिरी करणं आम्ही कधीही सहन करणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. “महाविकास आघाडीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडली होती की गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. पोलिसांनी आरोपींवर गोळी चालवली की, पोलिसांनी देखील गोळी का चालवली? असं विचारतात. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर डबल ढोलकी असल्याची टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठामपणे सांगितलं की, “जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.” या प्रकरणी सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लावून दोषींना फाशीची मागणी केली जाणार असल्याचं मोठं विधान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केलं आहे.

Baba Siddique

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू

आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय