Friday, November 22, 2024
Homeराज्यAsha Workers: जीव गेल्यावर शासननिर्णय काढणार का? आशांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष

Asha Workers: जीव गेल्यावर शासननिर्णय काढणार का? आशांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष

Asha Workers Protest : ‘फक्त आश्वासन नको, ताबडतोब शासननिर्णय जाहीर करा’, ‘जीआरचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही’, असा निर्धार करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. Asha Workers Strike 

उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने अनेक महिला आजारी पडल्या, तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आमचा जीव गेल्यावर सरकार शासननिर्णय काढणार आहे का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आशा सेविकांना 7 हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये आणि सर्वांना 2 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र, अद्याप तसा शासननिर्णय जाहीर झाला नसल्याने 15 दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता हजारो आशासेविका व गटप्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत.

सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये आशासेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविकांना 7 हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना 2 हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. तीन महिने उलटूनही संबंधित शासन आदेश अजून निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील आशा व गटप्रवर्तकांचे मुंबई च्या आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू आहे.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : 24 : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

GGMCJJH : सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत भरती; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय