Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:डीवायपाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिली महानाट्यतून शिवाजी महाराजांना मानवंदना

PCMC:डीवायपाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिली महानाट्यतून शिवाजी महाराजांना मानवंदना

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: युवा महाराष्ट्रतर्फे पिंपरी येथील डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी मध्ये महानाट्य साजरीकराणातून शिवरायांना मानवंदना दिली . यावेळी युवा महाराष्ट्र कडून ‘श्री शंभो: शिवजातस्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले.

समारंभास कॉलेजचे प्राचार्य डॉ ललितकुमार वाधवा, इतिहास संशोधक व मोडी लिपी अभ्यासक ब. ही. चिंचवडे व सरसेनापती येसाजी कंक यांचे १३वे वंशज आकाश कंक यांची प्रमुख उपस्थिती लाभली

यावेळी किल्ले शिवनेरी येथून युवा महाराष्ट्रच्या स्वयंसेवकांनी आणलेली ‘शिवज्योत’ कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
कॉलेजच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या पालखीचे पूजन करण्यात आले व महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अपरिचित घडामोडी व तत्कालीन जीवन प्रसंग ‘श्री शंभो: शिवजातस्य’ महानाट्याद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस ब.ही.चिंचवडे यांनी इतिहासातील अपरिचित पैलूंची माहिती आपल्या शैलीत दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यातसेच उपस्थित प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या स्वयंसेवकांचे अभिनंदन देखील केले.

कार्यक्रमास उपस्थित इन्स्टिट्यूटमधील शिक्षक वर्ग, विभागप्रमुख व प्रा.पंकज परदेशी, डॉ. पुष्पराज वारके,शेंडे सर,प्रा.गणेश पाटील व उपस्थित पालकवर्ग व विद्यार्थी या सर्वांचे आभार.
मिरवणुकीत पोलीस प्रशासनाचे व कॉलेज सुरक्षा रक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय