Friday, May 3, 2024
Homeक्रीडाविश्वअनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा बनले आई-वडील, मुलाचे नाव ठेवले अनोखे

अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा बनले आई-वडील, मुलाचे नाव ठेवले अनोखे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पुन्हा एकदा पालक बनले आहेत. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा १५ फेब्रुवारीला एका मुलाचे पालक झाले आहेत.

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केले. विराट कोहली सध्या टीम इंडियाचा भाग नाही. इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वीच विराटने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून अनेक रिपोर्ट्समध्ये अनुष्का आणि विराट कोहली दुस-यांदा आई-वडील होणार असल्याचे सांगण्यात आले होते. विराट कोहली आणि अनुष्का यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवले आहे.

विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, “आम्हाला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे ‘अकाय’ आणि ‘वामिका’च्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. आम्ही आमच्या आयुष्यातील या सुंदर काळाचा आनंद घेत आहोत. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतोय. यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.”

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील झाल्याची बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करताच शुभेच्छांचा पूर आला. क्रिकेट जगतापासून ते चित्रपटसृष्टीतील लोक विराट आणि अनुष्काला मुलाच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय