Friday, April 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुका स्वराज्य संघाच्या अध्यक्षपदी अनिल रोकडे याची निवड

जुन्नर तालुका स्वराज्य संघाच्या अध्यक्षपदी अनिल रोकडे याची निवड

जुन्नर : जुन्नर येथील रोकडे फार्म येथे पार पडलेल्या स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्याच्या मेळाव्यात अनिल रोकडे यांची जुन्नर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष हभप बाजीराव महाराज बांगर यांनी दिली. 

तसेच मेळाव्यात जुन्नर तालुका कार्यकारणी निवड व पदग्रहण समारंभ मेळाव्यात पार पडला. या कार्यक्रमाला राज्य कार्यकारणीतील सचिव श्यामकांत निघोट, राज्य संपर्क प्रमुख सचिन उढाणे, राज्य कोषाध्यक्ष रमेश भोसले, राज्य विस्तारक सचिन कारले, सोशल मीडिया प्रमुख निलेश सुकाळे तसेच जिल्हा कार्यकारितील अनिल दावघट, संतोष गावडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश टाव्हरे उपस्थित होते.

जुन्नर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे… 

उपाध्यक्ष शंकर कुमकर, अरुण कबाडी, सचिव राजेश भोर, कार्याध्यक्ष अरुण नेहरकर, सहकार्याध्यक्ष संजय नेहरकर, खजिनदार राजेश आमले, संघटक नंदू पानसरे, सहसंघटक नितीन डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख श्रेयस शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख किरण जगताप, कोषाध्यक्ष बाजीराव दुराफे, सोशल मीडिया प्रमुख शंतनू जोशी, संपर्क प्रमुख रोहिदास बटवाल, सहसंपर्क प्रमुख सुभाष आंद्रे, नागेश मनकर, शिवाजी बोडखे, अविनाश शेरकर, समन्वयक गणेश मोढवे अशी निवड करण्यात आली आहे, तर सदस्य म्हणून शांताराम बामणे, विजय कालेकर, अधिक मोजड, अनिल नाथ, विकास नेहरकर, ज्ञानेश्वर नायकोडी, राजेद्र पवार, संजय औटी, प्रशांत गायकवाड, सागर नेहे, अशोक मस्करे, रामदास काळे, ताराचंद जगताप, वामन जोगी, निलेश मस्करे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व सामुदायिक मानवंदना देऊन करण्यात आली. या कार्यक्रमाचे डॉ.विशाल आमले यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन गणेश मोढवे व शंतनू जोशी यांनी केले. या मेळाव्याला स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी संघाच्या कार्याची माहिती व पुढील धोरण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे १० वंशज हभप माणिक महाराज मोरे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी हभप बाजीराव महाराज बांगर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा स्वराज्य संघाचे अध्यक्ष आबा कुंजीर यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय