Friday, May 17, 2024
HomeAkoleअकोले येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; मागण्या करत दिला इशारा 

अकोले येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; मागण्या करत दिला इशारा 

अकोले : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भिकू संघटनेच्या नेतृत्वाखाली एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले येथे मोर्चा काढत  प्रकल्प अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही या मोर्चातून दिला‌.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’ने 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्यभरात प्रशासनाला निवेदने दिली जात आहेत‌. यावेळी डॉ. अजित नवले, गणेश ताजणे, रंजना प-हाड, आशा घोलप, नंदा म्हसे, निर्मला मांगे आदींसह उपस्थित होते. 

आंदोलनाची मागण्या पुढीलप्रमाणे : 

1) अंगणवाडी कर्मचारी ताईंना 15,000 रूपये मानधनवाढ तातडीने लागू करा.

2) ग्रॅज्युइटी (Gratuity) व पोषण ट्रॅकर ऍप बाबद सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे पालन करून अंगणवाडी कर्मचारी ताईंना त्याचा लाभ व्हावा यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करा.

3) सर्वांना नवीन मोबाईल व मोबाईल मध्ये मराठी ऍप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या.

4) सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंसाठी मासिक पेन्शन द्या. 

5) सर्व सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रलंबित निवृत्ती मानधन / पेन्शन तातडीने अदा करा.

6) मिनी अंगणवाडी ताईना कोणत्याही अटी व शर्ती शिवाय पुर्ण अंगणवाडीचा दर्जा लागू करा.

7) मदतनिसांना सेविका पदी बढती बाबत निकष सोपे सरल करा.

8) मदतनीस ताईंना सेविकेच्या तुलनेत 75% पगार लागु करा.

9) अकोले येथे झालेल्या मुक्काम मोर्चा आंदोलनात आपल्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासना प्रमाणे योग्यती कार्यवाही करून संघटनेची बैठक घेण्याबाबद पाल्यावतीने टाळाटाळ व विलंब होत आहे, त्या बाबद तातडीने उपाययोजना करा.

10) आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना प्रकल्प कार्यालयाकडून व्यक्तिगत दोषी मानून अपमान जनक वागणुन आपल्या कार्यकाळात होत असुन आंदोलक अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना सन्मानाची वागणूक घ्या.

11) संपूर्ण देशात भ्रष्ट शासनाने दिलेल्या सदोष मोबाईल मुळे व इंग्रजी अँप मुळे मोठे आंदोलन व कायदेशीर कार्यवाही सुरु आहे, तरीही आपल्या कार्यालयाकडून व्यक्तिगत- खाजगी मोबाईल वरून काम करण्याची अन्यायकारक सक्ती केली जात असल्याने सदर अनुचित प्रकरण तातडीने थांबवा.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय