Monday, May 6, 2024
Homeराजकारण'त्या' 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक

‘त्या’ 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. शिवसेनेत उभी फुट पाडून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. नंतर निवडणूक आयोगाने देखील शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. असे असले तरी एकनाथ शिंदेसह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावनीत न्यायालयाने शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षाकडे दिला आहे. आता शिवसेनेतील त्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरच घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. या पार्श्वभुमीवर राहुल नार्वेकर यांनी तातडीने बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा दिल्या होत्या. या आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता. या बैठकीत किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिले आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्या अगोदर शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून यावर निर्णय घेतला जाईल असं म्हटले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या सोबतच बंडखोर आमदारांच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात.

हे ही वाचा :

…आता पोलीसही कंत्राटी; तब्बल ‘इतकी’ पदे भरण्याचा निर्णय

धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

गुजरात मध्ये महापूराचे थैमान, १०२ मृत्यूसह ४११९ जनावरे दगावली

ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, सिनेविश्वात शोककळा

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

नोकरीच्या बातम्या वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय