मावळ : संत तुकाराम नगर (ठाकरवाडी) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, आणि निमा वूमेन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर (ठाकरवाडी), सदुंबरे येथे सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात 80 महिला, मुली, पुरुषाची हिमोग्लोबिन चेक करून औषध, गोळ्या देण्यात आल्या. तसेच वाढती व्यसनाधीनता यावर निमा विमेन फोरम च्या महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. प्रज्ञा खोसे यांनी व्यसन केल्याने आपल्या शेरीरावर होणारे दुष्परिणाम यावर भाष्य करून महिला आणी मुलीनी मश्री लावल्याने किती वाईट परिणाम होतात हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. यावेळी डॉ.उर्मिला व्यवहारे, डॉ.मयुरी मोरे, डॉ.बालाजी माने यांनी ही शिबिरात सहभाग घेऊन शिबीरार्थींना आरोग्य चांगले ठेवण्याचा सल्ला दिला.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे, अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा समितीचे सदस्य आणि जांभवडे गावचे ग्राम पंचायत सदस्य कॉम्रेड बाळासाहेब शिंदे, सिटूचे डॉ.बाबासाहेब देशमुख, नामदेव सूर्यवंशी, अशोक उजागरे, दादू जाधव, तसेच अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या मीरा भांगे, जनाबाई जाधव, ताई मेंडाळे, सोनाली जाधव, अर्चना जाधव, वैशाली भांगे, संगीता मेंडाळे, अंजना खादवे, सोनाली मेंडाळे, बेबी मेंडाळे, बायडा मेंडाळे, यमुना जाधव, कांताबाई गावंडे, मनीषा जाधव इत्यादी कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
या शिबीराची सुरवात राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, तर प्रास्ताविक व डॉक्टरांची ओळख कॉम्रेड गणेश दराडे यांनी करून दिली, व आभार आर्चना जाधव हिने मानले.
हे ही वाचा :
अमित शहांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धव ठाकरेंवर, मातोश्रीचा धसका कायम; राऊत यांची टीका
ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…