Monday, May 20, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : शरद पवार यांना धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक

मोठी बातमी : शरद पवार यांना धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने पुण्याहून अटक केली. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. एका ट्विटर हॅन्डलवरून आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली.

तुझा लवकरच दाभोलकर होणार अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. तर एका ट्विटर हॅन्डलवरून आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती.

धमकीप्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट 2 कडे सोपवण्यात आला. त्यानंतर तपासाची सूत्रे हालली व तपासणीच्या आधारे पोलिसांचे पथक पुणे येथे पोहचले. पुणे येथून पोलिसांनी सागर बर्वेला ताब्यात घेऊन अटक केली.

त्याने तो धमकीचा मेसेज पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सागरकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे. सागर हा तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याच्या चौकशीनंतर आणखी काही बाबीचा उलगडा होणार आहे, असेही समजते.

हे ही वाचा :

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय