Friday, May 3, 2024
Homeराजकारणअमित शहांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धव ठाकरेंवर, मातोश्रीचा धसका कायम...

अमित शहांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धव ठाकरेंवर, मातोश्रीचा धसका कायम राऊत यांची टीका

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या दौऱ्यावर होते. नांदेड त्यांची सभा देखील झाली. या सभेतून त्यांनी एक प्रकारे लोकसभा आणि विधानसभेसाठी रनशिंग फुंकले. त्यावेळी शहा यांनी उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप करत ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

अमित शहा यांच्या सर्व टीकांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. धोका कोणी दिला, का दिला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. तुम्हीच काही वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ना, आता त्याच शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला मुख्यमंत्री करून मिरवताय. आम्हाला धोका दिला त्याची कबुलीच तुम्ही देताय, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्या आरोपांवर केली.

खासदार राऊत यांनी एक ट्वीट देखील केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन. अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय, शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय, असं ट्वीट केलंय.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय