शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डाँ नीलम गोऱ्हे (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरू नगर येथे संवाद साधला. लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या कडे व्यक्त केला. (ALANDI)
या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहीणींनी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायास या निधीचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले.
आनंदाचा शिधा, लाडकी बहीण सन्मान योजना, वयोश्री योजना तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी तीर्थक्षेत्र पर्यंटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत
भविष्यातही यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपणास धनुष्य बाणावर उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे असे सांगितले.
स्त्रियांचा सन्मान हाच स्त्रीयांचा अधिकार. मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादनही नीलमताई गोऱ्हे यांनी केले. महिलांना आत्मसन्मान व सुरक्षितेसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांची बहीण आहे यामुळे अधिक सशक्त झाल्या आहेत असे मत लाडकी बहीण सन्मान योजनेत संवाद करताना काढले.
शिवसेना पदाधिकारी सारिका पवार, मनिषा पलांडे, पुजा राक्षे, सुदर्शना त्रिगुणाईत, शैला पाचपुते, शेतकरी नेते गणेश सांडभोर उपस्थित होते
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले