Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी कु.रसिका कुटे यांची निवड

ALANDI : पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी कु.रसिका कुटे यांची निवड

केळगाव मध्ये जल्लोषात सत्कार (ALANDI)

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदाचे परीक्षेत केळगाव येथील शेतकरी कुटुंबातील कु. रसिका नितीन कुटे या तरुणीने उज्ज्वल यश संपादन केले. तिच्या यशस्वी वाटचालीतून केळगावच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला असून केळगावचे वैभवात वाढ केली आहे. (ALANDI)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन (PSI) पोलीस उपनिरीक्षक पदी कु. रसिका नितीन कुटे हिची नियुक्ती झाली. या निमित्त केळगावात समस्त ग्रामस्थ आणि कुटे कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्र परिवार यांनी जल्लोष साजरा केला.

कु.रसिका कुटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगाव मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विविध सेवाभावी व्यक्ती, संस्था पदाधिकारी, केळगाव ग्रामस्थ यांनी जल्लोष करीत कु.रसिका कुटे यांचे अभिनंदन करून सत्कार केल्याची माहिती केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांनी दिली.

रसिका हि नितीन सदाशिव कुटे यांची कन्या असून त्यांनी नोकरी आणि शेतीच्या जोडधंद्याच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलांचे शिक्षणाकडे लक्ष दिले. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना शिक्षण दिले. रोजच्या दगदगीच्या जीवनातून मुलीला पाहिजे त्या गोष्टीतून सहकार्य केले. तिच्या या संघर्षामध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आई – वडिल, आजी, आजोबा, चुलते, काकी इतर नातेवाईकांनी सहकार्य केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय