Friday, May 3, 2024
Homeजिल्हाAlandi : आळंदी बाह्यवळण शिवरस्त्यातील अडथळे दूर करण्याची मागणी

Alandi : आळंदी बाह्यवळण शिवरस्त्यातील अडथळे दूर करण्याची मागणी

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी नगरपरिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा शिवरस्ता अनेक वर्षापासून प्रभावी विकास कामापासून वंचित राहिल्याने वाहनचालक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ALANDI NEWS

या रस्त्याच्या विकासाचे काम केल्या तीन महिन्यापासून सुरू करण्यात आले असून ते संथ गतीने होत आहे. यामुळे रहदारीला व वाहनचालकांच्या ये जा करण्यास गैरसोयीचे ठरत आहे.

नागरिक भाविक तसेच या मार्गावरून येणारे वाहन चालक यातून नाराजी व्यक्त करीत आहेत. येथील इंद्रायणी नदीचे दक्षिण तटावरील साधकाश्रम समोरील शिव रस्ता विकास कामातील राडाराडा जागेवरच ढीग ठेवून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.

सदरचा राडाराडा मातीचा ढीग तात्काळ हटविण्यात यावा आणि रहदारी सुरळीत, सुरक्षित होईल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वाहन चालक नागरिक यांच्याकडून होत आहे.

या शिव रस्ते विकासामुळे तसेच बाह्य मार्गाचे काम तात्काळ झाल्यास देहू फाटा, चाकण चौक येथील वाहतूक कोंडी दूर होईल. यासाठी नागरिकांचे मागणी प्रमाणे रस्ते विकासातील अडथळे दूर करून येत्या पालखी सोहळ्या पूर्वी शिव रस्ता आणि बाह्यवळण मार्ग विकसित करावा अशी मागणी श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक सचिन शिंदे यांनी केली आहे. ALANDI NEWS

या संदर्भात मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, रस्ते विकासाची कामे सुरू आहे. कामातील अडथळे दूर करून काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत या भागात इंटर सेप्रेटर लाईन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

या मुळे नदी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचा हा प्रयोग आहे. हे काम पूर्ण झाले नंतरच रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करता येईल असे त्यांनी सांगितले. तापर्यंत रस्त्यातील माती, राडा रोडा ढीग हटविले जातील असे त्यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय