amol Kolhe, shivajirao adhalrao patil : शिरूर लोकसभा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिरूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (amol Kolhe) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या अगोदरच डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रावादी (अजित पवार गटाच्या) उमेदवारी बाबत खळबळजणक विधान केले आहे.
शिरुर लोकसभेसाठी माझ्या विरोधात मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) माझ्याविरोधात छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते, मुख्यमंत्र्यांच्या मनात छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती होती, असं विधान केले आहे. पुढे ते म्हणाले. मात्र त्यांनी नाही म्हटल्यामुळे आताच्या चार पक्षात बेडूक उड्या मारून आलेल्या उमेदवाराला, जे शिरुरसाठी पहिली पसंतीच नव्हते, त्यांना ही उमेदवारी देण्यात आल्याची टीका कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली.
भोसरी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भोसरी येथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे (amol Kolhe) यांनी हे विधान केले आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदरच कोल्हेंनी भुजबळांना उमेदवारी देण्याचा दावा केल्याने चर्चेला उधान आले आहे.
आढळराव पाटीलांचे प्रत्यूत्तर
डॉ.अमोल कोल्हे यांच्या विधानावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, कोल्हे बालिश विधानासाठी प्रसिद्ध आहेत. कोल्हे सकाळी उठून संजय राऊत सारखे काहीही बालिश विधानं करतात, असे म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंना उत्तर दिले. तसेच, छगन भुजबळ जर राष्ट्रवादीचे असतील, तर शिंदे कशाला असं विधान करतील? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून अन्वर शेख शिरूर लोकसभेसाठी मैदानात आहे.
हे ही वाचा :
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ
ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी
नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी
ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर
मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…