Tuesday, May 21, 2024
Homeकृषीदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

नाशिक (प्रतिनिधी) : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीला घेऊन आज नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अप्पपररप जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती वतीने काल २० जुलै पासून राजव्यापी आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलन महाराष्ट्राभर पसरत असताना नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 

सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

राजू देसलेराज्य सचिव 

महाराष्ट्र राज्य किसान सभा.

केंद्र सरकारने २३ जून रोजी १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, ३० हजार टन बफर दूध स्टाक करावे, तसेच प्रति किलो निर्यात अनुदान ३० रुपये देण्यात यावे, दूध पावडर, बटर, तूप व इतर दुग्धजन्य पदार्थवरील जीएसटी रद्द करण्यात यावे, पुढील ३ महिन्यासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

निवेदन देताना किसान सभेचे राज्य देसले, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, शेतकरी संघर्ष संघटनेचे हंसराज वडवुले, हंसराज बच्छाव, किसान सभेचे समीर शिंदे, नामदेव बोराडे, विठोबा धुळे इत्यादी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय