Friday, May 17, 2024
Homeग्रामीणआंबे पिंपरवाडी येथे मनरेगाच्या कामाला वेग; १००० वृक्ष लागवडीसाठी प्रत्यक्ष सुरुवात.

आंबे पिंपरवाडी येथे मनरेगाच्या कामाला वेग; १००० वृक्ष लागवडीसाठी प्रत्यक्ष सुरुवात.

जुन्नर (प्रतिनिधी) :- आंबे पिंपरवाडी येथे मनरेगाच्या कामाला वेग आला असून १००० वृक्ष लागवडीसाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

             गेली ८ दिवसांपासून मनरेगा अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम चालू आहे. आज त्यामध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली. आंबे पिंपरवाडी गावाचे सरपंच मुकुंद घोडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

          पिंपळ, आवळा, वड, वावळा, करंज, हिरडा, बेहडा, जांभळा, उंबर, नीलमोहर, आंबा, कांचन इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

          यावेळी मजुरांसोबत किसान सभेचे विश्वनाथ निगळे, डीवायएफआयचे संजय साबळे, गणपत घोडे, ज्ञानेश्वर सावळे, ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय