Wednesday, November 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबुधवार पेठेतील महिलांसाठी एक हात मदतीचा

बुधवार पेठेतील महिलांसाठी एक हात मदतीचा

मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशनचा व भगीरथ तापडिया ट्रस्टचा उपक्रम

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : दि.16 –
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक मा.श्री शेखरजी मुंदडा यांच्या प्रेरणेने, आणि भगीरथ तापडिया ट्रस्ट यांच्या सहाय्याने “मंथन फाउंडेशन” च्या माध्यमातून बुधवार पेठेतील मंथन संस्थेशी जोडल्या गेलेल्या ९० HIV सह जगणाऱ्या महिलांना एक महिना पुरेल इतके राशन किटचे वाटप करण्यात आले. पुणे सार्वजनिक सभागृह, बुधवार पेठ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२२ पासून प्रत्येक महिन्यात चालत आलेला असून संपूर्ण एक वर्ष चालू ठेवण्याचा महाएनजीओ फेडरेशनचा आणि भगीरथ ट्रस्टचा मानस आहे. या किट मध्ये गहू, डाळ, सोयाबीन, तांदूळ, मटकी, तेल, राजगिरा लाडू इत्यादी पौष्टिक आहाराचे पदार्थ समाविष्ट केलेले असून HIV रुग्णांच्या च्या मूलभूत गरजांचा विचार करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी भगीरथ तापडिया ट्रस्ट चे संस्थापक विशेष उपस्थिती मा. राजेंद्रजी तापडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


उपस्थित प्रमुख मान्यवर अंजलीताई तापडिया, मनीषजी देशपांडे (प्रशासक) तापडिया ट्रस्ट आणि शंकरजी ठुबे ( निवासी नायब तहसीलदार पुणे शहर), अमर चव्हाण (प्रकल्प क्षेत्रिय अधिकारी सेतू महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रंण संस्था) आणि कु.तनुश्री ठूबे (स्वयंसेवक) व महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंदजी शिंदे व प्रशासकीय संचालक श्री.राहुलजी जगताप, ॲड. देवकुळे उपस्थित होते.कार्यक्रमाअंतर्गत मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी मंथन संस्थेच्या कामाबद्दलची सविस्तर माहिती दिली.तसेच वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या समस्या देखील मांडल्या. समाजातील विविध घटक एकत्र येऊन काय विधायक काम करता येईल यावरही चर्चा करण्यात आली.


हा सामाजिक उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श घालून देणारा व प्रेरणादायी आहे.मंथन फाउंडेशन तर्फे आम्ही महा एनजीओ फेडरेशन व भगीरथ ट्रस्ट, मा राजेंद्रजी तापडिया व अंजलीताई तापडिया यांचे ऋणी आहोत. भगीरथ तापडिया ट्रस्टचे प्रशासक मनीष देशपांडे आणि अमर चव्हाण यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कविता सुरवसे यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रुतिका यादव, सारीका पवार, सुवर्णा पवार व बाबू शिंदे तसेच मंथन फाउंडेशनच्या सर्व पीयर एज्युकेटर यांनी मेहनत घेतली.

विशेष लेख : असंघटित कष्टकरी, कंत्राटी कामगारांची ‘गधा मजदूरी’ म्हणजे मालकवर्गाचे नफ्याचे अर्थशास्त्र

आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय