चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) चेक बेरडी गावात एक अनोखी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. या गावातील एका शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या बकरीच्या पिल्लाने अख्खं गाव चकित केले आहे. या बकरीच्या पिल्लाचे विशेष म्हणजे त्याचा चेहरा माणसासारखा दिसत होता. (Chandrapur)
चेक बेरडी गावातील शेतकरी आत्राम परिवाराच्या बकरीला दोन पिले झाली. त्यातील एक पिल्लू सामान्य आणि इतर पिल्लांसारखे होते. मात्र दुसरे पिल्लू गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या पिल्लाचा चेहरा एखाद्या वृद्ध माणसासारखा दिसत होता. दाढी, माणसासारखे डोळे आणि चेहऱ्याचे वैशिष्ट्ये असलेले हे पिल्लू पाहण्यासाठी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हे पिल्लू जन्मताच अतिशय नाजूक होते.
आत्राम परिवाराने या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या पिल्लाच्या मृत्यूनंतर गावातच खड्डा खणून आत्राम परिवाराने हे विचित्र पिल्लू पुरले. या विचित्र पिल्लाच्या जन्माची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. (Chandrapur)
तज्ञांच्या मते, हे कोणतंही आश्चर्य नव्हे तर जनुकीय बदलाचा परिणाम आहे. जनुकीय बदलामुळे या पिल्लाच्या चेहऱ्याचे रूपांतर माणसासारखे झाले होते. अशा घटनांमध्ये जनुकीय बदलामुळे विविध स्वरूपे दिसतात, जेव्हा जनुकीय माहितीची पुनर्रचना होते.
Chandrapur येथील घटना
हे विचित्र पिल्लू आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गावातील लोकांमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. हे पिल्लू मृत्यूनंतर गावात पुरले गेले असले तरीही, त्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. बकरीच्या पिल्लाच्या माणसासारख्या चेहऱ्याच्या या घटनामुळे गावातील नागरिकांच्या मनात अजूनही आश्चर्य आणि कुतूहल कायम आहे.
हेही वाचा :
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म