Eknath Khadse : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे लवकरच पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. दिल्लीत भाजपच्या हायकमांडशी भेट झाल्यानंतर एकनाथ खडसे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो देखील समोर आला होता. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची घरवापसी होणार असल्याच्या सांगितले जात आहेत. या वृत्तावर आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही माहिती दिली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येत्या 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अप्रत्यक्षपणे दुजोरा देत अजित पवार म्हणाले की, बरेच दिवस त्यांची घालमेल सुरू होती, आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर
वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार
कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!