Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याLoksabha Election : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी मंत्री शिंदे गटात

Loksabha Election : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी मंत्री शिंदे गटात

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) नेत्यांचे पक्ष बदलण्याची कार्यक्रम जोरदार सुरू आहे. आता उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अनेक दिवसांपासून बबनराव घोलप हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशात आता पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. बबनराव घोलप यांच्या सोबतच माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी देखील (६ एप्रिल) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच घोलप म्हणाले की, “जेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विचारले की मला का काढून टाकण्यात आले. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मला जे काही पद दिले जाईल त्याचा मी न्याय करेन.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Loksabha Election) जागा शिवसेनेला जाणार की राष्ट्रवादीला याची चर्चा असतानाच मंत्री बबनराव घोलप यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. याचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय