Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याAjmer Train Accident : अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून...

Ajmer Train Accident : अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळ उखडले

Ajmer Train Accident : राजस्थानमधील अजमेरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. राजस्थानमधील अजमेर येथील मदार स्थानकासमोर साबरमती आग्रा कॅन्ट सुपरफास्ट ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा अजमेरमधील (Ajmer Train Accident) मदार रेल्वे स्थानकाजवळ दोन गाड्या रुळावर आल्या, त्यामुळे इंजिनसह पॅसेंजर ट्रेनचे चार जनरल डबे रुळावरून घसरले आणि रुळ उखडले. साबरमती आग्रा कँट सुपरफास्ट गाडी क्रमांक 12548 चे 4 डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे घबराट निर्माण झाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना रात्री उशिरा पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी), अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, साबरमती आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वेने हेल्प डेस्क क्रमांक ०१४५-२४२९६४२ जारी केला आहे. ट्रेनमधील प्रवासाबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

रेल्वेने चौकशी समिती स्थापन केली

या अपघाताच्या घटनेनंतर अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. अशी माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशिकिरण यांनी दिली. तसेच रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिनची दुरुस्ती करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे. असेही ते म्हणाले.

whatsapp link

हे ही वाचा :

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

संबंधित लेख

लोकप्रिय