Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयPenis drug injection : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन;...

Penis drug injection : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Penis drug injection : अमली पदार्थांचा विळखा भारतात विविध शहरांमध्ये अलीकडे वाढत आहे. तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेत आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. अतिश्रीमंत कुटुंबातल्या तरुणांपासून सामान्य घरांमधल्या तरुणांपर्यंत सगळेच या विळख्यात अडकत आहेत. पंजाबमध्ये अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणानं स्वतःचे प्राण गमावले आहेत. (Penis drug injection)

पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या विळख्यात आणखी एका तरुणानं जीव गमावला आहे. ही घटना तरनतारन जिल्ह्यातली आहे. कुटुंबीयांनी अमली पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध, त्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. (Penis drug injection) मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला अमली पदार्थांचं व्यसन होतं. कुटुंबीयांनी हे व्यसन सोडून देण्याबाबत त्याला वारंवार समजावलं होतं. तरीही त्याचं अमली पदार्थांच्या सेवनाचं व्यसन सुटलं नव्हतं.

पंजाबच्या तरनतारन जिल्ह्याच्या अलगोकोठी इथं अमली पदार्थाचं इंजेक्शन टोचून घेतल्यामुळं एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. अजय कुमार (वय 22, रा. अलगोकोठी) असं मरण पावलेल्या युवकाचं नाव आहे. घराच्या बाथरूममध्ये त्यानं त्याच्या गुप्तांगाला इंजेक्शन टोचलं. बाथरूममध्येच त्याच्या मृतदेहाजवळ सीरिंजदेखील मिळाली आहे. (Penis drug injection) अजय कुमार याचे वडील रमेश कुमार आणि काका बलजीत कुमार यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या मुलाला अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. त्यांनी अनेकवेळा प्रयत्नपूर्वक त्याला हे व्यसन सोडून चांगल्या प्रकारे आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा दिली होती; मात्र त्याचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला.

अजयचे वडील आणि काका यांनी सांगितलं, की अलगोकोठीमध्ये खुलेआम अमली पदार्थमिश्रित औषधं विकली जात असतात. या अवैध व्यवहारांवर पोलीस कारवाई न करता मूग गिळून गप्पा राहतात आणि तरुणांच्या मृत्यूचा तमाशा बघत आहेत. नातेवाईकांनी एसएसपीकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते अन्य तरुणांच्या बाबतीत घडू नये, इतर मुलं अमला पदार्थांच्या आहारी जाऊ नयेत, यासाठी हा प्रयत्न असल्याचं सांगितलं. अलगोकोठी चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी तक्रार दाखल होताच, तातडीनं कारवाई केली जाईल, असं डीसीपी प्रीतिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय