जुन्नर / आनंद कांबळे :शिवनेरी येथे स्वराज्य संग्रामच्या वतीने गेली नऊ वर्षे, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. Shivneri स्वच्छता मोहिमेला यंदा नऊ वर्ष पूर्ण झाली. शिवजयंतीनंतर स्वच्छता मोहिमेचे नियोजन करून सर्व शिवप्रेमींनी जवळपास १४ पोती प्लास्टिक जमा करून याही वर्षी ती संबंधित अधिकारी मंगल काळे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केली. Plastic Free Shivneri – Responsibility of Swarajya Sangram
याकरता सांगली, पुणे येथील संदीप कोकाटे, योगेश मोटे, रमेश खंडागळे, अविनाश पाटील, शिवदास भोसले, मस्कु हजारे, प्रवीण पाटील, महेश लाड आदी शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. सकाळी 11 ला सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम चार वाजता समाप्त झाली. यावेळी नवनियुक्त सरपंच शिवदास भोसले, शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे अविनाश पाटील, प्रगतशील शेतकरी रमेश खंडागळे, देश सेवेतून निवृत्त झालेले प्रविण पाटील व मस्कु हजारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय अधिकारी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात रमेश खरमाळे व मंगल काळे यांचा देखील यावेळी स्वराज्य संग्रामच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना स्वराज्य संग्राम चे अध्यक्ष महेश लाड म्हणाले की, “प्लास्टिक मुक्त शिवनेरी ही स्वराज्य संग्राम ची जबाबदारी आहे, लहान- मोठी मुलं किंवा प्रौढ व्यक्तींनी आपण इथं का येतो किंवा आल्यावर आपण इथे कचरा फेकू नये ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे.” यापुढे आपण स्वराज्यासाठी नवीन किल्ले बांधू शकत नाही किंवा नवीन गड किल्ले जिंकू शकत नाही आपण किमान जे आहे ते जतन करू शकतो आणि त्यासाठी आपण सर्वांनी समुदायिकपणे प्रयत्न करूया असे आवाहन शिवनेरी किल्ला येथे भेट देणाऱ्या शिवप्रेमींना केले.
यावेळी सर्व उपस्थितांचे आभार स्वराज्य संग्राम चे खजिनदार रमेश खंडागळे यांनी मानले. स्वच्छता मोहिमेची संयोजन संदीप कोकाटे योगेश मोटे व महेश लाड यांनी केले होते.
हे ही वाचा :
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा