Saturday, May 11, 2024
Homeजुन्नरJunnar : जागतिक महिला दिनानिमित्त ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीनचे लोकार्पण व मोफत...

Junnar : जागतिक महिला दिनानिमित्त ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीनचे लोकार्पण व मोफत तपासणी शिबिर

जुन्नर / आनंद कांबळे : जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने महिलांच्या आरोग्य विषयक समस्यासाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत जुन्नर (Junnar) तालुक्यातील प्रसिद्ध निर्यातदार लक्ष्मण मारुती भुजबळ यांनी आपली आई स्व. शकुंतला मारुती भुजबळ यांच्या स्मरणार्थ महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी आवश्यक असणारे आठ लक्ष रुपयांचे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन फाउंडेशनला भेट दिले असून फाउंडेशनच्या वतीने पुढील काळात जुन्नर (Junnar) तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी शिबिरांचे आयोजन करून महिलांची ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली. Junnar news

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ होत्या तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.तेजश्री जुनागडे कॅन्सर सर्जन अहमदनगर व कॅन्सर योद्धा ऐश्वर्या भोसले उपप्रबंधक एसबीआय पुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक ललिता लक्ष्मण भुजबळ होत्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, श्रीमती आर. ओ. रॉय, प्राचार्य डॉ.दत्तात्रय बाळसारफ, स्नेहल बाळसारफ, डॉ.अमेय डोके, डॉ संतोष सहाणे, डॉ. अजित वलवणकर, डॉ. मनोज काचळे, डिसेंट परिवारातील सर्व महिला वैद्यकीय अधिकारी, तसेच डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई, उपाध्यक्ष योगेश धर्मे, सचिव फकीर आतार, आदिनाथ चव्हाण, संतोष यादव, जयवंत डोके, पांडुरंग तोडकर, तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी मंगल कार्यालय जुन्नर येथे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मशीनचे लोकार्पण व तपासणी शिबिरांचे आयोजन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ म्हणाल्या की, आज देशात २८ महिलांच्या मागे एक महिला स्तनाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो तर दर १४ मिनिटाला एका महिलेचा कॅन्सर मुळे मृत्यू होतो. दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व वेळेवर तपासणी करून घेतल्यास तसेच कॅन्सरचे जरी निदान झाले तरी पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील कॅन्सर बरा होऊ शकतो. परंतु तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील कॅन्सर हा मात्र प्राणघातक ठरू शकतो. साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. मात्र, डीसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा व निरोगी आयुष्य जगावे.

या प्रसंगी महिलांची ब्रेस्ट कॅन्सर ची मोफत तपासणीही करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता वामन यांनी केले, प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले तर आभार आदिनाथ चव्हाण यांनी मानले.

कॅन्सरचे प्रमाण आजच्या आधुनिक काळात सर्वाधिक – डॉ.तेजश्री जुनागडे, कॅन्सर सर्जन अहमदनगर

‘कॅन्सरचे प्रमाण आजच्या आधुनिक काळात सर्वाधिक असून विशेषता समाजात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यावर खरी गरज त्यांना मानसिक आधाराची असते. डिसेंट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत कॅन्सरच्या रुग्णांना आधार देण्याचे काम पुढील काळात निश्चित होईल.

कर्करोग झालाय हे समजल्यानंतर खचून न जाता, त्याचा स्वीकार करून आजारावर मात करा – ऐश्वर्या भोसले, कॅन्सरयोद्धा

‘कर्करोग झालाय हे समजल्यानंतर खचून न जाता, त्याचा स्वीकार करून आजारावर मात नक्कीच करता येते,या आजाराबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन, मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे… कदाचित आपल्या संवादामुळे एखाद्याला त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळू शकते. महिलांनी आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असणे आणि त्यात कुटुंबियांनी साथ देणे खूप महत्वाचे ठरते.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय