Monday, May 20, 2024
Homeग्रामीणकेंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व प्रतिकार दिन

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व प्रतिकार दिन

धारूर(प्रतिनिधी):- अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व श्रमिक विरोधी  धोरणाच्या निषेधार्थ २७ मे रोजी देशव्यापी विरोधाची हाक दिली होती. त्यानूसार धारूर तालुक्यातील दहा ते बारा गावामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन अखिल भारतीय किसान सभा धारूर तालुका वतीने बीड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉ.मोहन लांब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

        शारिरीक आंतर पाळुन शेतकऱ्याच्या बांधावर व सर्व शेतकऱ्याच्या दारात भाजपच्या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व श्रमिक विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात धारूर तालुक्यातील गांजपूर, चिंचपूर, चोरंबा, आसोला, सोनी मोहा, वाघोली व आसर डोह येथील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले  होते

यामध्ये कॉ मोहन लांब, कॉ. सुसेन सिरसट, कॉ.काशिराम सिरसट, दादा सिरसट, भास्कर डापकर,  संजय चोले, मधुकर चव्हाण, दीपक घवाने, खमर काद्री, दत्ता मोरे, प्रलाद दोंडे, अशोक काळे, रामभाऊ पिंगळे, शिवाजी रुपणर, दीपक घवाने, कैलास चव्हाण, रवी चोले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय