जुन्नर : देवराम लांडे माईक समोर आले की देहभान विसरून स्वतः किती चांगला, मीच किती चांगला असे दाखविण्याचा प्रयत्न करतात, अशी खोचक टिका राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे यांनी एका युट्यूब चँनेलवर दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
पुढे बोलताना देवाडे म्हणाले, देवराम लांडे म्हणतात, अंजनावळे, निमगिरी येथे किराणा वाटप केला आहे. परंतु किराणा वाटपच करण्यात आला नसल्याचे भाऊ देवाडे यांनी म्हटले आहे. तसेच तालुक्यातील काही लोकांना बेनके कुटुंबियांवर टिका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असे देवराम लांडे यांचे नाव न घेता टिका केली आहे. देवराम लांडे म्हणजे गजर गाड्यांचा नैवेद्य शेंगोळ्यांचा, अशी खोचक टिका केली आहे.