Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना योध्या आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवा; या संघटनेने केली मागणी.

कोरोना योध्या आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवा; या संघटनेने केली मागणी.

नाशिक(प्रतिनिधी):- कोरोना योध्या आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या आयुक्त व महापौर यांच्या कडे निवेदनद्वारे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी केली आहे. 

           महानगरपालिकेचे आरोग्य विभाग, आशा कर्मचारी कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र कामाचा मोबदला मिळत नाही. तरी सर्व्ह काळात करत असलेल्या कामाचा मोबदला ३०० रुपय प्रतिदिन द्या, आशा ना  सॅनिटायजर, मास्क, हॅन्डग्लोज, टोपी उपलब्ध करून घ्या, आशांंना वरिष्ठ अधिकारी सन्मानाची  वागणूक देत नाही यांची नोंद घ्यावी, राज्यातील मुंबई, पुणे सह मनपा आशा ना प्रोत्साहन भत्ता देत आहेत, त्याप्रमाणे नाशिकमध्ये पण त्याची अंमलबजावणी करा. आशांंना जाहीर झालेली सप्टेंबर २०२० मधील वाढ २००० रुत्रियेत लागू करा, आशा वर हल्ला करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा आदी मागण्याचे निवेदन आयटकच्या वतीने देण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय