बीड : जाती अंत संघर्ष समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक म्हणून कॉम्रेड मोहन जाधव यांची निवड करण्यात आली.
मोहन जाधव हे डीवायएफआयचे बीड जिल्हा अध्यक्ष असून ऊसतोडणी कामगार चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेत एसएफआयचे राज्य अध्यक्ष म्हणून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. डाव्या-कम्युनिस्ट चळवळीतील लढ्यात ते अग्रेसर आहेत.