Sunday, February 16, 2025

Khopoli : खोपोली-शिल्फाटा मार्गावर टँकर उलटून आग, वाहतूक तीन तास ठप्प

नवी मुंबई : खोपोली-शिल्फाटा मार्गावर बुधवारी सकाळी रसायनाने भरलेला टँकर उलटल्यामुळे मोठा अपघात घडला. सकाळी सुमारे ५.५० वाजता खोपोलीहून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या दिशेने येणाऱ्या या टँकरला अपघात झाला. (Khopoli)

टँकरमध्ये असलेल्या एथनॉलमुळे रस्त्यावर सुमारे २५ फूटपर्यंत गळती झाली आणि काही वेळातच आग लागली. टँकरच्या चालकाने प्रसंगावधान राखत त्वरित बाहेर उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, टँकरला लागलेल्या आगीने रस्त्यावर वेगाने फैलाव घेतला.

या दुर्घटनेमुळे खोपोली-शिल्फाटा मार्गावरील वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. (Khopoli)

पोलिसांनी रस्ता तात्पुरता बंद करून अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी क्रेनचा वापर केला. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान

ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles