Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा

अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविक, वारकरी यांच्या आरोग्य सेवेसाठी अलंकापुरी प्रतिष्ठान यांच्या वतीने वारीच्या काळात आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी दिली आहे.

आळंदी – पंढरपूर दरम्यान आरोग्य सेवा अलंकापुरी प्रतिष्ठान तर्फे उपलब्ध करून आली . या सेवेचा प्रारंभ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफाळकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगरसेवक पांडुरंग वहीले, शामराव गिलबिले, नितीन साळुंके, सोमनाथ डवरी, नीलेश वीर, उपाध्यक्ष बंडु नाना काळे, आकाश जोशी, अविनाश गुळुंजकर, सचिन जगताप, योगेश सिंह, शंकर येळवंडे, काशिनाथ ठाकूर, विशाल येळवंडे, आळंदीतील वैद्यकीय पथक, डॉ. चौधरी, डॉ.शुभांगी नरवडे, डॉ. विद्या कांबळे यावेळी उपस्थित होते. .

आरोग्य सेवेत वैद्यकीय पथक, तज्ञ डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काळात पालखी मुक्कामाचे ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फ़ा वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी च्या दृष्टीने अलंकापुरी प्रतिष्ठान तर्फे च्या अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य सेवा दिली असल्याचे अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले.

विशेष लेख : असंघटित कष्टकरी, कंत्राटी कामगारांची ‘गधा मजदूरी’ म्हणजे मालकवर्गाचे नफ्याचे अर्थशास्त्र


आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय