Saturday, April 27, 2024
HomeNewsसावरगाव सोसायटी चेअरमन पदी जगन्नाथ तौर बिनविरोध

सावरगाव सोसायटी चेअरमन पदी जगन्नाथ तौर बिनविरोध

आळंदी/अर्जुन मेदनकर : येथील सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित सावरगांव बुद्रुकच्या चेअरमन पदी जगन्नाथ तौर, व्हाईस चेअरमन पदी प्रल्हाद इंगोले यांनी बिनविरोध निवड झाली. यावेळी गणेश बापू तौर, लक्ष्मण ढोबळे, दिगंबर रासवे. सर्जेराव वक्ते, कल्याण राऊत, विजय गुंजाळ, सदाशिव दादा तौर, मारोतराव तौर, राधाकिसन काळे, गजानन तौर, त्रिवेणीबाई तौर, मंदाकिनी तौर या संचालकांसह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा माजी सरपंच विठ्ठल नाना तौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीचे परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समर्थकांनी जल्लोष करून युवक तरुण, नागरिक, प्रगतशील शेतकरी यांनी सत्कार केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय