पिंपरी चिंचवड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
शहरातील विविध संघटनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे पेढे वाटुन आनंद साजरा केला. त्यावेळी माजी स्थायी अध्यक्ष संतोष लोंढे, ओबीसी संघर्ष समिती शहराध्यक्ष आनंदा कुदळे, बारा बलुतेदार महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, वंचित बहुजन आघाडी चे युवानेते संतोष जोगदंड, बारा बलुतेदार महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, ओबीसी संघर्ष सेना शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट व ओबीसी कार्यकर्ते आदी सर्व ओबीसी संघटना, ओबीसी नेते, कार्यकर्ते यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचे जोरदार स्वागत केले.
– क्रांतिकुमार कडुलकर