Monday, May 6, 2024
HomeNewsबंडखोर आजी माजी खासदारांविरोधात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

बंडखोर आजी माजी खासदारांविरोधात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

खा.श्रीरंग बारणे म्हणजे शहर शिवसेनेची पनवती आहे : ॲड. सचिन भोसले


पिंपरी चिंचवड, दि.२१ : खासदार श्रीरंग बारणे म्हणजे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेला लागलेली पनवती होती ते ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात. ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची संख्या कमी झाली.ते शिवसेनेत आले शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली. आता ते एकनाथ शिंदे गटात गेले आहेत ते एकनाथ शिंदेंचा गट ही संपवणार आहेत. अशी कडक टीका पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख ॲड.सचिन भोसले यांनी केली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड.सचिन भोसले यांनी खासदार श्रीरंग बारणे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर कडक शब्दात टीका केली.

ते म्हणाले की, खासदार बारणे, माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. तुमच्यावर गद्दार म्हणून बसलेला हा शिका पुढच्या पाच पिढ्या पुसता येणार नाही. शिवसेनेचे प्रतिनिधी होऊन तुम्ही जी संपत्ती जमा केली ही लपवण्यासाठीच तुम्ही आता शिवसेनेशी गद्दारी केली आहे.

यावेळी ॲड. सतीश भोसले म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या या गद्दार लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी शिवसैनिकांनी स्वतःच्या घरादाराकडे दुर्लक्ष करून निवडून दिले. तुमची जी संख्या आहे ती शिवसैनिकांमुळेच आहे. भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकार पाडण्यासाठी कुटील डाव खेळला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडले.

यावेळी शहर प्रमुख सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, प्रसिद्धीप्रमुख भाविक देशमुख, अल्पसंख्यांक प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख आनंद कोराळे, विधानसभा संघटिका अनिता तूतारे, माजी विधानसभा संघटिका मंगलताई घुले, शहर संघटक रोमी संधू, विशाल यादव, युवा सेना अधिकारी माऊली जगताप, उपशहर प्रमुख तुषार नवले, पांडुरंग पाटील, अमोल निकम, सुधाकर नलावडे, युवराज कोकाटे, रावसाहेब थोरात, परशुराम आल्हाट, समन्वयक पार्थ गुरव, गणेश आहेर, कैलास नेवासकर, संतोष सौंदनकर, राहुल भोसले, दत्तात्रय भालेराव, कैलास कदम, संतोष वाळके, सतीश मरळ, राजू सोलापुरे, शिवाजी कुराडकर, विशाल चव्हाण, गोरख पाटील, प्रदीप दळवी, चंद्रकांत शिंदे, सय्यद पटेल, दादा नरळे, महेश जाधव, नितीन बोंडे, मच्छिंद्र देशमुख, दीपक भक्त, भरत इंगळे, दिलीप शिंदे, संजय ससाने, सचिन चिंचवडे, गणेश जिले, राजेंद्र पालांडे, गणेश जाधव, विपुल टेहरे, गजानन धावडे, शत्रुघ्न वाघ, अजित घोरपडे, प्रशांत तरवटे, सहदेव अवसरमल, शंकर कुराडकर, जितेंद्र शिगवण, अशोक गायकवाड, अनंत मते, प्रकाश जाधव, अनिल तारू, सर्जेराव कचरे, अभिमन्यू सोनसळे, सहदेव चव्हाण, भरत पाटील, राजू तुपे, कैलास तोडकर, रामदास गाढवे, निवृत्ती आमुप, संदीप टोके, दत्ताराम ढोले, वैभव छाजेड, अर्जुन कदम, मुकुंद ओव्हाळ, दादा ठाकरे, मनोहर कानडे, संजय यादव, रविराज मांडले, जगदीश येवले, महेश शितोळे, निलेश खंडेराव, शंकर घंटे, वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, वैभवी घोडके, बेबी सय्यद, प्रज्ञा उतेकर, शिल्पा देशमाने, तसलीम शेख, अश्विनी खंडेराव महिला आघाडी, आजी-माजी पदाधिकारी व युवा सेना व शिवसैनिक उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय