उत्तराखंड : अल्मोड़ा जिल्ह्यातील एक भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाला आहे, कारण 40 सीट असलेल्या बसमध्ये 63 प्रवासी बसवले गेले होते. (Accident)
ही बस गढ़वाल मंडलच्या पौड़ी जिल्ह्यातून रामनगर जात होती. सल्ट गावाजवळ सकाळी 8:45 वाजता बस अनियंत्रित होऊन 150 मीटर खोल खाईत गाडी घुसली.
सदर अपघातात 28 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जणांनी रुग्णालयात उपचार घेत असताना प्राण गमावले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आसपासचे लोक आणि पोलिस, एसडीआरएफच्या टीमने मदत कार्य सुरू केले.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 5 जणांना सल्टच्या देवायल रुग्णालयात, 15 जणांना रामनगर रुग्णालयात आणि 4 जणांना उच्च दर्जाच्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. (Accident)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, पौडी आणि अल्मोड़ा येथील संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. ओव्हरलोडिंग हा या अपघाताचे मुख्य कारण ठरले आहे.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर