Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : एनआयपीएमतर्फे आयोजित 'स्टुकॉन' विद्यार्थी परिषद उत्साहात संपन्न

PCMC : एनआयपीएमतर्फे आयोजित ‘स्टुकॉन’ विद्यार्थी परिषद उत्साहात संपन्न

“पुनर्शोधासाठी लवचिकता” या संकल्पनेवर आधारित परिषदेचे एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने आयोजन (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) पुणे विभाग व एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने “पुनर्शोधासाठी लवचिकता” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘स्टुकॉन’ ही विद्यार्थी परिषद उत्साहात संपन्न झाली. उद्घाटन सत्रात या परिषदेच्या समन्वयक व एनआयपीएम पुणे विभागाच्या उपाध्यक्ष डॉ.कीर्ती धारवाडकर यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थी परिषदेचे महत्व व माहिती सांगितली. (PCMC)

तर स्वागतपर मनोगतात एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार यांनी एनआयपीएमच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थीविषयक उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर परिषदेच्या मुख्य अतिथी साज टेस्ट प्लांट प्रा.लि. च्या कार्यकारी संचालिका ऋतुजा जगताप, वेबॅस्टो इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष विकास प्रसाद, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी त्यांच्या मनोगतातून विविध अनुभवांचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (PCMC)


तर परिषदेच्या “पुनर्शोधामध्ये शिक्षणाची भूमिका” या विषयावरील पहिल्या परिसंवादात जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. आहुजा यांच्यासह पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू मणिमाला पुरी,डी.वाय.पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. प्रभात रंजन, अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर पूनम कश्यप यांनी सहभाग नोंदवला, या पहिल्या परिसंवादाचे समन्वयक म्हणून डीएमसी फिनिशिंग स्कुलचे संचालक व एनआयपीएम पुणे विभागाचे खजिनदार डॉ.संजय झोपे यांनी काम पाहिले. तर “संस्थात्मक लवचिकता – नेतृत्व आणि अनुकूलता” या विषयावरील परिषदेच्या दुसऱ्या परिसंवादात केएसपीजी ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. चे सीएचआरओ व कार्यकारी संचालक विक्रम म्हस्के,वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या संस्था विकास विभागाचे अध्यक्ष शंतनू घोषाल, एम्डॉक्स सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचे संचालक रविंदर पाल सिंग,सीओईपीच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे अकार्यकारी संचालक व प्राज इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट धोरण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर हे सहभागी झाले होते.

सारलोहा एडव्हान्स्ड मटेरियलचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. अजित ठाकूर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या विद्यार्थी परिषदेच्या तिसऱ्या “प्रतिकूल परिस्थितीतील लवचिकता निर्माण” या विषयावरील परिसंवादात जॉन डिअर कंपनीच्या वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका कविता कालीकर,आयएसी ग्रुपच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या संचालिका दीपाली खैरनार, यांत्रा कंपनीच्या वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका श्रुती पुजारी सहभागी झाल्या होत्या.

तर निओरारे सर्व्हिसेस एलएलपीच्या संचालिका वहिदा पठाण यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

या विद्यार्थी परिषदेत सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. पुणे परिसरातील विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयातील सुमारे नऊशेहुन अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

तर समारोप सत्रात एनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सोनावणे यांनी आभार प्रदर्शन केले. या विद्यार्थी परिषदेसाठी डॉ. कीर्ती धारवाडकर,पवन शर्मा,डॉ.सतीश पवार, वहिदा पठाण व एनआयपीएमच्या कार्यकारी समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय