Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शाळांच्या करिता बेंच (बाक), टेबल खुर्ची खरेदी करिता विशिष्ठ ठेकेदार...

PCMC : शाळांच्या करिता बेंच (बाक), टेबल खुर्ची खरेदी करिता विशिष्ठ ठेकेदार यांना फायदा होणाऱ्या निविदा रद्द करा – राहुल कोल्हटकर

मनपा आयुक्त शेखर सिंह यांचेकडे मागणी (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने शहरातील शाळांच्या करिता बेंच (बाक), टेबल खुर्ची खरेदी करिता विशिष्ठ ठेकेदार यांना फायदा होईल या हेतूने दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत जी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे ती रद्द करावी, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना दिलेले आहे. (PCMC)

प्रमुख मागणीपत्र

१. कोरोना काळात टेबल खुर्ची टेंडर प्रक्रियेत निकृष्ट दर्जाचे तसेच निविदा प्रक्रिया तपशील नुसार अयोग्य वस्तू पुरवठा करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्यासाठी निविदा अटी शर्ती त्याच्या पद्धतीने तयार करून टेंडर प्रक्रियेत रिंग करणाऱ्या भांडार , शिक्षण विभागातील अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी.

२. विशिष्ठ ठेकेदार यांना लाभ मिळावा या पद्धतीने निविदा प्रक्रिया तयार केली असल्याने सदर निविदा रद्द करून शहरातील उद्योजक यांना भाग घेता येईल अशा अटी शर्ती टाकण्यात येवून निविदेत स्पर्धा निर्माण करावी जेणे करून अनेक ठेकेदार सहभागी होऊन वस्तूचा दर्जा तसेच दरात स्पर्धा तयार होऊन ठराविक महानगरपालिकेचे पैसे वाचून विशिष्ट ठेकेदार यांना लाभ मिळणार नाही. याकरिता निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती रद्द करून नवीन योग्य आणि सर्वसमावेशक अटी शर्ती टाकण्यात याव्यात. (PCMC)


पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची, बेंच (बाक ) तसेच शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभाग यांच्या वतीने दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर निवीदा ही शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या २ ठेकेदार यांना लाभ मिळावा ह्या हेतूने त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र , कागदपत्र , तसेच शॉप ॲक्ट मध्ये फर्निचर चा उल्लेख असावा अशा अटी तसेच खालील काही मुद्दे यांची अट ठेवण्यात आली आहे. (PCMC)

1. past 7 years experience compulsory
2. OEM Authorized reseller compulsory
3. BIFMA level 3 certificate compulsory

वरील अटी शर्ती मुळे सदर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणें राबविण्यात येत नसल्याची तक्रार अनेक ठेकेदार तसेच यात सहभागी होऊ इच्छित असणारे उद्योजक यांनी व्यक्त केली आहे. तरी सदर निविदा प्रक्रिया मध्ये शहरातील इतर अनेक ठेकेदार सहभागी व्हावे म्हणुन सदर निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती सर्वसमावेशक करण्यात याव्यात तसेच सदर निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.

निविदा प्रक्रिया पारदर्शी करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने यापूर्वी कोरोना काळात शालेय विद्यार्थी यांना टेबल खुर्च्या पुरवठा करणाऱ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, त्यात टेंडर प्रक्रियेत निकृष्ट दर्जाचे तसेच निविदा तपशील नुसार अयोग्य वस्तू पुरवठा करणाऱ्या ठेकेदार याला पुन्हा काम मिळावे ह्या हेतूने भांडार आणि शिक्षण विभाग यातील अधिकारी यांनी सदर निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती तयार करून रिंग तयार केली आहे तरी सदर निविदा तयार करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभाग आणि शिक्षण विभाग यातील अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच कोरोना काळात पुरवठा करणाऱ्या त्या ठेकेदार यांच्या कामाची चौकशी करून त्याला ब्लॅक लिस्ट करून या निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असे संबंधीत अधिकारी यांना आदेश देण्यात यावे. (PCMC)


पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शालेय विद्यार्थी यांना बाक , टेबल खुर्ची आणि फर्निचर खरेदी करिता दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत जी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर निविदा ही विशिष्ठ ठेकेदार यांना लाभ मिळावा या पद्धतीने निविदा प्रक्रिया तयार केली असल्याने सदर निविदा रद्द करून शहरातील उद्योजक यांना भाग घेता येईल अशा अटी शर्ती टाकण्यात येवून निविदेत स्पर्धा निर्माण करावी.

जेणे करून अनेक ठेकेदार सहभागी होऊन वस्तूचा दर्जा तसेच दरात स्पर्धा तयार होऊन ठराविक महानगरपालिकेचे पैसे वाचून विशिष्ट ठेकेदार यांना लाभ मिळणार नाही. याकरिता निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती रद्द करून नवीन योग्य आणि सर्वसमावेशक अटी शर्ती टाकण्यात येवून पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांस करण्यात येत आहे.
सदर निवेदन विचार करून त्वरित योग्य कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय