Vidhanasabha Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 15 ऑक्टोबर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषदेत घेत तारखांच्या घोषणा केल्या आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर राज्यातील सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक राज्यात एकाच टप्प्यात होणार असून मतदान 20 नोव्हेंबर तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. 29 ऑक्टबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. मात्र, यंदा हरियाणाच्या निवडणुका आधी जाहीर झाल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
Vidhanasabha Election
हेही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती