Thursday, November 21, 2024
HomeराजकारणMaharashtra politics : अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, ‘या’ आमदाराची इच्छा

Maharashtra politics : अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, ‘या’ आमदाराची इच्छा

Maharashtra politics : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. 

अमोल मिटकरी यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावे. कारण प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार आहेत, तर अजित पवार हे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे वैचारिक वारसदार आहेत. आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

मिटकरी पुढे म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे यासाठी पूर्वी काही प्रयत्न झाले होते, परंतु त्यास दोन्ही पक्षांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरीसुद्धा, या दोन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.. 

अकोला येथे 13 ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी प्रकाश आंबेडकर आणि अमोल मिटकरी यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागले आहेत,  त्या बॅनरवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार अवघ्या दहा मिनिटांतच बाहेर पडल्याची बातमी चर्चेत होती. मात्र, मिटकरींनी यावर प्रतिक्रिया देत सांगितले की, अजितदादा नाराज नाहीत. उलट महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

Maharashtra politics

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय