Thursday, November 21, 2024
HomeराजकारणSitaram Yechury : कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे देहदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Sitaram Yechury : कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे देहदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक केला व्यक्त

Sitaram Yechury : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (एम्स) रुग्णालयास नवी दिल्ली येथे अभ्यास आणि संशोधनासाठी दान करण्यात आला आहे.

येचुरी यांचे काल दुपारी तीन वाजता निधन झाले, श्वास घेण्यास त्यांना त्रास झाल्यामुळे १९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

एम्सने एक निवेदन जारी करत याची माहिती दिली आहे की, येचुरी यांच्या परिवाराने त्यांचा मृतदेह एम्स दिल्लीला दान केला असल्याचे यात म्हटले आहे.

सीताराम येचुरी यांचा जन्म १९५२ मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात कर्मचारी होते. आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) मध्ये एमएची डिग्री मिळवली होती. सीताराम येचुरी १९७५ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले.

Sitaram Yechury

१९७५ मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. आणीबाणी मध्ये त्यांनी विद्यार्थी दशेत संघर्ष केला होता. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निषेधाचे पत्रक वाचून येचुरीनी सरकार विरोधात विद्यार्थी दशेत आंदोलनास सुरवात केली. झोतात आले होते.

गेली चार दशके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी आयुष्य झोकून दिले.२००५ ते २०१७ पर्यंत ते राज्यसभा खासदार होते. त्यांनी २००५ ते २०१५ पर्यंत माकपचे जनरल सेक्रेटी पद भूषविले. केंद्रात २००४ साली यूपीए सरकार स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

येचुरी माझे मित्र होते. त्यांना आपल्या देशाची उत्तम ज्ञान होती आणि ते भारत या संकल्पनेचे समर्थक होते. त्यांच्याबरोबर आता दीर्घकाळ चर्चा रंगणार नाहीत.
– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

सीताराम येचुरी यांच्या निधनाने दु:ख झाले. ते डाव्यांचे एक प्रमुख नेते होते आणि राजकीय स्पेक्ट्रम ओलांडून संपर्क साधण्याच्या क्षमतेसाठी ते ओळखले जात होते. प्रभावी संसदपटू म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह माझ्या संवेदना आहेत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय