Saturday, October 5, 2024
Homeक्राईमMumbai :तरुणाने मैत्रिणीवर चाकूने हल्ला करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Mumbai :तरुणाने मैत्रिणीवर चाकूने हल्ला करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Mumbai : मुंबईच्या भांडूप उपनगरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ३३ वर्षीय ज्ञानदेव भांगे नावाच्या व्यक्तीने त्याच्या जवळच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही हल्ला करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांना ,या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची चौकशी केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि ज्ञानदेव काही वर्षांपासून चांगले मित्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. याच कारणामुळे रागाच्या भरात ज्ञानदेवने तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात महिलेच्या मानेवर गंभीर जखम झाली.

पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपी ज्ञानदेव भांगेविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय