Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिका यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा संयुक्त बैठक संपन्न

PCMC : महापालिका यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा संयुक्त बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिका यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणेने आपसांत समन्वय ठेवून पूरपरिस्थितीची आपत्कालीन परिस्थिती हाताळावी, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. (PCMC)

महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठक आयुक्त शेखर सिंह यांनी आज घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, संदीप खोत, निलेश भदाणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अंकुश जाधव, सीताराम बहुरे, किशोर ननावरे, उमेश ढाकणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उप आयुक्त बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार, स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते.

नदीच्या पाण्याची अथवा सखल भागातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी तातडीने संयुक्त मोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित करावे, नदीपात्राकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्सनी बंद करावेत. तसेच पोलिसांनी शहरातील रस्त्यांची वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. (PCMC)

नद्यांवरील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रपाळीमध्ये शीघ्र कृती दलाने दक्ष रहावे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून तसेच त्यासाठी लागणाऱ्या वाहनांची संख्यादेखील वाढवून वेळेत परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करावे, उपाययोजना म्हणून नजीकच्या रुग्णालयातील खाटा आरक्षित ठेवाव्यात, अधिकाऱ्यांनी शहरात कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी, वैद्यकीय पथकाने सातत्याने निवारा केंद्रातील तसेच विविध परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, निवारा केंद्रांच्या ठिकाणी जेवणासह इतर कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

झाडपडीच्या घटनांची माहिती मिळताच तात्काळ त्यावर कार्यवाही करावी, स्वच्छता पथकांची नेमणूक करून कोठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी, किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करावी, नदीच्या पाण्याच्या पातळीची वाढ लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना तातडीने ध्वनिक्षेपकाद्वारे तसेच प्रत्यक्ष स्थळी जावून सूचना द्याव्यात, आवश्यकता भासल्यास नियंत्रण पथकांद्वारे त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हटवावे, पाणी साचणाऱ्या सखल भागांवर लक्ष ठेवावे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत तसेच तुंबलेले चेंबर्स वेळोवेळी दुरूस्त करावेत, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या. (PCMC)


पूरबाधितांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्राचा व त्याठिकाणी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी घेतला घेतला. तसेच आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन कामकाजात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सोबत घेवून आपत्कालीन परिस्थिती हाताळावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेला सिजन ग्रुप, सोशल वेलफेअर ट्रस्ट सांगवी, शितोळेनगर मित्र मंडळ सांगवी, बालाजी प्रतिष्ठाण सांगवी, शिवदुर्ग मित्र, सह्याद्री ऑफरोड ऍडव्हेंचर्स ऍन्ड रेस्क्यू ट्रस्ट, आपत्ती व्यवस्थापन संघ भोसरी, पुणे ऑफरोडर्स, पीसीएमसी योद्धा आपदा मित्र, महाराणा प्रताप मित्र मंडळ पिंपरी आदी स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहेत, अशी माहिती मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली आहे. (PCMC)

नागरिकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश

सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय