Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पालिकेची डासोत्पत्ती ठिकाणे तपासणी मोहीम तीव्र, ५७४ घरावर दंडात्मक कारवाई,...

PCMC : पालिकेची डासोत्पत्ती ठिकाणे तपासणी मोहीम तीव्र, ५७४ घरावर दंडात्मक कारवाई, २२ लाख रुपये दंड वसूल

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यावसायिक आस्थापना, गृह सोसायट्यांसह घरांची तपासणी मोहीम तीव्र करून डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले. (PCMC)

शहरात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिका रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनिता साळवे, डॉ. तृप्ती सागळे, डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. आर. पी. फिरके, डॉ. अल्वी सय्यद नासीर, डॉ. आर.एस.लोखंडे, डॉ.संध्या भोईर, डॉ.श्रीकांत सुपेकर, डॉ.वैशाली भामरे, डॉ.श्रद्धा कोकरे, डॉ.अभिजित सांगळे यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयांचे सर्व सहायक आरोग्याधिकारी उपस्थित होते. (PCMC)

शहरात किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व भागात तपासणी मोहीम राबविण्यात येत असून १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २२ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

डेंग्यू तसेच झिका सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागामार्फत संयुक्त मोहीम राबवली जात आहे. डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आरोग्य पथक प्रत्येक भागात तपासणी करत आहे.

त्यानुसार शहरातील सुमारे ३ लाख ९९ हजार १४३ घरांची तपासणी केलेल्या ७ हजार सातशे दहा ठिकाणी डास आळी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ५७४ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ६० हजार ३८४ घरांची तपासणी करून १०६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ४ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २४ हजार ७०४ घरांची तपासणी करून ७९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ४ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५१ हजार ९१५ घरांची तपासणी करून ३७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ९६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५८ हजार ६०९ घरांची तपासणी करून ७० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे २ लाख ४३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४७ हजार ७४९घरांची तपासणी करून २० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ७८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ८९ हजार ६९४ घरांची तपासणी करून २०९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ६ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत३३ हजार ३५६ घरांची तपासणी करून ३६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे १ लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३२ हजार ७३२ घरांची तपासणी करून १७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे ८३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणी मध्ये १७ लाख ८४ हजार ९६७ कंटेनर, डास अळ्या आढळलेले १० हजार १८५ कंटेनर, १ हजार २०४ बांधकाम ठिकाणे, ८ हजार १९४ रिकामे कंटेनर, ४ हजार ५४५ एबेट टाकलेले कंटेनर आदींचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान सुमारे २ हजार ३९६ नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली. (PCMC)

महापालिकेच्या वतीने तपासणी तसेच जनजागृती मोहीम तीव्र करण्यात येणार असून तपासणी पथकांची संख्या देखील वाढवली जाणार आहे.

क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील सर्व सहाय्यक आरोग्य अधिका-यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकाद्वारे सर्व गृह सोसायट्यांना भेटी देऊन तपासणी अंती डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यास महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले. (PCMC)

आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरात तसेच परिसरात डासोत्पत्तीची ठिकाणे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रत्येक आठवड्यात आपले घर आणि परिसराची स्वच्छता करून आपले व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी.

विजयकुमार खोराटे,अतिरिक्त आयुक्त

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय