Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

Junnar : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असलेल्या आंबे, हातविज, आणि पिंपरवाडी या गावांचा संपर्क आज सकाळी इंगळून घाटात दरड कोसळल्याने तुटला आहे. ग्रामस्थांच्या मते, पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळली असावी.

सकाळी ग्रामस्थ हे इंगळूनच्या दिशेने घाट उतरून येत असताना त्यांनी रस्त्यात मोठा दगड पडलेला पाहिला आणि तात्काळ या संदर्भात ग्रामस्थ तसेच स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. दरड कोसळल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, आंबे, हातविज, आणि पिंपरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.

पोलीस पाटील विष्णू घोडे यांनी सांगितले की, काही दिवसांपुर्वी याच ठिकाणी लहान दगड आणि माती साचलेली होती, परंतू पावसामुळे मोठे दगड मोकळे झाले होते आणि भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते याबाबत प्रशासनाला कळवले होते.

Junnar

ग्रामस्थांनी पर्यटकांना कांचन धबधबा आणि दुर्गादेवी या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे, कारण या भागात अजूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय